30.1 C
Panjim
Wednesday, March 22, 2023

देवगड समुद्रात अनोळखी जहाज, इंडोनेशिया येथून गुजरातकडे जात असल्याची प्रशासनाची माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – देवगड पवनचक्‍कीसमोरील समुद्रात एक महाकाय जहाज येऊन ठेपले आहे. हे जहाज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. अनोळखी जहाज उभे असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. गुरुवारी सकाळपासून हे जहाज याठिकाणी उभे आहे.

हे जहाज इंडोनेशिया येथून गुजरातकडे जाणारे प्रवासी जहाज असून ते तांत्रिक बिघाडामुळे पवनचक्‍कीसमोर समुद्रात थांबल्याचे निष्पन्‍न झाल्याने सुरक्षा यंत्रणेबरोबरच सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

मात्र, या प्रवासी जहाजाने वीस वर्षांपूर्वी देवगड समुद्रात आढळलेल्या अलमुर्तदा जहाजाची आठवण करून दिली. देवगड पवनचक्‍कीसमोर समुद्रात गुरुवारी सकाळी एक महाकाय जहाज उभे असल्याचे नागरिकांना दिसले.

ही बातमी देवगड परिसरात समजताच जहाज पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. मात्र, हे अनोळखी जहाज देवगड पवनचक्‍कीसमोर समुद्रात थांबल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू झाली.

देवगड पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस कर्मचारी यांनी पवनचक्की बीच येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व या जहाजाबाबत माहिती घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

अखेर हे जहाज प्रवासी जहाज असून ते इंडोनेशिया देशातून गुजरात येथे दुरुस्तीसाठी जात असल्याचे निष्पन्‍न झाले.जहाजावर ‘वर्ल्ड’ असे नाव असून इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे जहाज देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात थांबले आहे.

जहाजामध्ये प्रवाशी नसून फक्‍त कर्मचारी आहेत. जहाजावरील कर्मचार्‍यांनी त्यांचा यंत्रणेशी संपर्क साधला असून ती यंत्रणा जहाज दुरुस्त करून अथवा पर्यायी व्यवस्था करून जहाज घेवून जाणार आहे. या जहाजामध्ये संशयास्पद काहीही नसल्याचे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

यापूर्वीही देवगड समुद्रात ‘अलमुर्तदा’ जहाज बंद अवस्थेत आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती.त्यानंतर जून 2010 मध्ये देवगड तांबळडेग समुद्र किनार्‍यासमोर खोल समुद्रात संशयास्पद जहाज आढळल्याने खळबळ उडाली होती.

गेले चार दिवस बंद अवस्थेत असलेल्या इंडोनेशिया येथून आलेल्या जहाजाच्या दुरूस्तीसाठी दुसरी बोट देवगडमध्ये रविवारी दाखल झाली आहे.जहाजाच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

या जहाजाच्या दुरूस्तीसाठी यंत्रणा मागविण्यात आली होती. अखेर दुरूस्तीसाठी दुसरे जहाज देवगडमध्ये दाखल झाले. दुरूस्तीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे असे प्रशासकीय यंत्रणेने सांगितले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles