28 C
Panjim
Monday, May 23, 2022

दाउदची दलाली केल्यानंतर सुद्धा मालिकांचे समर्थन केले जातेय आशिष शेलार यांचा राज्य सरकारवर निशाणा

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – दाउदची दलाली केल्यानंतर सुद्धा, दाउदच्या परिवारासोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्यानंतर सुद्धा, मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपींशी संबंध ठेवल्यानंतर सुद्धा आणि त्यांचे हस्तक म्हणून काम केल्यानंतर सुद्धा या राज्यातील एक मंत्री राजीनामा देत नाही. विशेष म्हणजे नवाब मलिक यांचं समर्थन करणार नेतृत्व सरकारमध्ये बसलेले असेल तर ही मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांशी प्रतारणा आहे. अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सिंधुदुर्गमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावी तरी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कस्टडी मध्ये आहेत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग सारखे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आणि राज्यभर रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, दाउदची दलाली केल्यानंतर सुद्धा, दाउदच्या परिवारासोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्यानंतर सुद्धा, मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपींशी संबंध ठेवल्यानंतर सुद्धा आणि त्यांचे हस्तक म्हणून काम केल्यानंतर सुद्धा या राज्यातील एक मंत्री राजीनामा देत नाही. विशेष म्हणजे त्याच समर्थन करणार नेतृत्व सरकारमध्ये बसलेले असेल तर ही मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांशी, जवनांशी, भारतीयांशी प्रतारणा करत आहे. काळ त्यांना शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही. भाजपा याबाबतीत कधीच गप्प बसणार नाही जोरदार आंदोलन करणार. असेही ते यावेळी म्हणाले.

जे आहे ते पेपर वर आहे स्वतः नवाब मलिक हे मान्य करतात की, 2005 साली मी हसीना पारकर यांच्याकडून जागा विकत घेतली. हसीना पारकर ही काही या देशातली सन्माननीय, महनीय व्यक्ती होती का ? तिच्याशी आर्थिक व्यवहार करताना तुमची बुद्धी कुठे गेली होती ? आणि म्हणून जय स्वतः मान्य करत आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी राजकीय पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत हे निषेधार्ह आहे. सामान्य माणूस देशहितासाठी स्वतःचे प्राण द्यायला तयार होतो. मात्र स्वतःच्या पक्षासाठी नेते कोणत्या थराला जातात याच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img