तोक्ते चक्रीवादळातील नुकसानभरपाईचा १४८२ कोटींचा प्रस्ताव – पालकमंत्री उदय सामंत

0
43

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी १४८२ कोटींचा प्रस्ताव आयुक्तांकडे जिल्हाधिकार्‍यांनी पाठवला आहे. तो राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे जाईल. शासनाने जाहीर केलेले २५२ कोटी येत्या दोन दिवसात सिंधुदुर्गात येतील. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी कोविड केअर सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांना बिले आकारली जातात.त्यामुळे यापुढील काळात नागरिकांनी बिले अदा करण्‍यापूर्वी ऑडिटरने तपासल्यानंतरच बिले अदा करावीत. रुग्णवाहिकांबाबत जिल्हा परिषदने एक तरी रुग्णवाहिका दिली का? याचे उत्तर द्यावे. जिल्ह्यात आणखीन एसडीआरएफ मधून १० रुग्णवाहिका देणार आहे. जनतेच्या आरोग्याला फार महत्त्व असल्यामुळे हा निर्णय आम्ही घेतला. मात्र चक्रीवादळानंतर तब्बल २० ते २२ दिवसांनी लोकांच्या घरांवरील पत्रे पुन्हा घातल्यानंतर केंद्रीय समिती येऊन काय केले? त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर केंद्र सरकारने मदत द्यावी असा उपरोधिक टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायतला विद्युत दाहिनी जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार आहे.आपत्कालीन व्यवस्थेसाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आलेला आहे.अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफ दोन पथके ४० सदस्यांसह सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत.संभाव्य धोका टाळण्यासाठी या दृष्टीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोविड केअर सेंटर आहेत त्याठिकाणी इंधन व जनरेटरची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. जिल्ह्याबाहेर परदेशात जे विद्यार्थी शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here