तिलारीचा कालवा फुटल्याने खळबळ दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर पाणीच पाणी

0
148

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग साटेली-भेडशी खानयाळे येथील तिलारीचा डावा कालवा फुटल्याने दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. राज्यमार्गावर आवाडे येथे अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे येथील वाहतूक काही वेळ बंद होती त्यामुळे वाहने दोन्ही बाजूला अडकली होती.
तर लगतची घरे पाण्याखाली जातील अशी भीती ग्रामस्थात निर्माण झाली होती.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना होतो पाणीपुरवठा

डाव्या कालव्याचे दरवाजे बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कालव्यालगतची घरे पाण्याखाली जातील अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळाची स्थिस्ती निर्मण झाली होती. तिलारी पाटबंधात प्रकल्पातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना पाणीपुरवठा केला जातो.

नदीला पुराची स्थिती

तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा फुटल्याने नदीला पूर आला आहे. हा कालवा फुटल्याने चक्क ऐन उन्हाळ्यात पूर आला आहे. दरम्यान तिलारी विभागाचा मनमानी कारभार समोर येत असून निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केदारांच्या निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी दोडामार्ग येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

लाखो लिटर पाणी वाया

तिलारी प्रकल्पाच्या डावा कालवा खानयाळे येथे आज दुपारी फुटून लाखो लिटर पाणी भेडशी येथिल आवाडे येळपईवाडी नदीला पूर येऊन दोडामार्ग तिलारी मार्ग वाहतुकीस बंद झाला.रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगच रांगच लागल्या होत्या.भर उन्हाळ्यात रस्त्यावर पूर आल्याने सर्व नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आजगेकर यांनी पाहणी करून शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी पंचनामा केला जाणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here