जिल्हा शल्य चिकित्सकांनी बदली रद्द करण्यासाठी आरोग्य प्रधान सचिवांना दिले लेखी पत्र.. आपण विनंती बदली न मागताच झाली बदली;सासरे कोविड पॉझिटिव्ह आल्याचे पत्रात केले नमूद..

0
142

सिंधुदुर्ग -शासनाने माझी बदली कोणत्याही प्रकारची विनंती बदली न मागता थेट माझी बदली झाली आहे.माझे सासरे कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यांना पाहण्यासाठी कोणीही नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग या पदावरुन कार्यमुक्त करु नये व बदली रदद करावी, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी बदली रद्द करण्यासाठी आरोग्य प्रधान सचिवांना लेखी पत्र पाठवले आहे.

दिलेल्या पत्रात, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई ( मार्फत मा.उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर ) यांना जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग या पदावरुन कार्यमुक्त न करणेबाबत व बदली रदद करणे बाबत मागणी केली आहे.

शासन आदेशानुसार माझी बदली विनंतीनुसार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे कोणताही विनंती अर्ज नसतांना करण्यात आलेली आहे . माझे सासरे श्री.एस.पी.नाईक (वय ७२ वर्षे) हे कोविड १९ आजाराने अतिदक्षता विभाग जिल्हा रुग्णालय सिंधुदूर्ग येथे दि .२५ नोव्हेंबर पासून दाखल असून , त्यांचेवर सद्यस्थितीत व्हेन्टीलेटरवर उपचार चालू आहेत . या परिस्थितीत मी त्यांना कोठेही नेऊ शकत नाही . त्यांची दैनदिनी काळजी घेण्यासाठी अन्य कोणीही नसून , सर्व काळजी मलाच घ्यावी लागते . कृपया वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माझी विनंती नसतांना , शासन आदेशात विनंतीने दाखविलेली बदली रदद करावी. वरील रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत आहे ,असे डॉ.एस.एच.चव्हाण दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली राजकीय दबावातून झाली का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बदली आदेशात विनंती बदली झाल्याचे नमूद केले असले तरी गेल्या दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात डॉक्टर चव्हाण रुजू झाले होते. मग यांची बदली कोणत्या कारणातून झाली असा प्रश्न निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here