26.8 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

चिपी विमानतळाला आजही परवाना नाही, खासदार राऊत यांनी जनतेचे चेष्टा थांबवावी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सल्ला

spot_img
spot_img
spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – चिपी विमानतळाच्या उद्धघाटनाची तारीख पे तारीख देऊन खासदार विनायक राऊत यांनी जनतेची चेष्टा थांबवावी. या विमानतळाची डीजीसीआय ने सुचविलेली कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे या विमानतळाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली आहे.

विमानतळाची बरीच कामे बाकी

चिपी विमानतळाला अजूनही परवानगी मिळालेली नाही. या विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. विमानतळ संलग्न रोडचे काम अजूनही सुरु झालेले नाही. विमानतळाला अद्यापही पुरेसा पाणीपुरवठा झालेला नाही. एका विहिरीवरून हा पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. लाईट पुरवठ्याचे कामही अजून सुरु झालेले नाही. हि सर्व कामे झाल्यानंतरच या विमानतळाला परवानगी मिळेल असेही ते म्हणाले.

विनायक राऊत हे जनतेची चेष्टा करताहेत

खासदार विनायक राऊत यांनी तारीख पे तारीख देऊन जनतेचे चेष्टा करू नये. मागचे ५ वर्ष पालकमंत्री तुमचे होते. आताही पालकमंत्री तुमचे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलूनच मी हे विधान करतोय. विमानतळ होणे हे जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे नारायण राणे, सुरेश प्रभू यांची लागेल ती नादात घ्या आणि विमानतळाची कामे पूर्ण करून विमानतळ सुरु करा. परंतु खोटी माहिती जनतेला देऊ नका अशी आपली विनंती असल्याचे ते म्हणाले.

तर त्या घटनेची चौकशी लावा

चिपी विमानतळाच्या बाजूला असलेल्या १३०० एकर जमिनीच्या सातबारावर पेन्शीलने सूचना घालून हि जमीन हडप करण्याचा नारायण राणे यांनी प्रयत्न केला होता असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता. याबाबत बोलताना राजन तेली म्हणाले, राज्यात सेनेचे सरकार आहे. त्यांनी याबाबत चौकशी लावावी. ज्यावेळी मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा सुरु होती त्यावेळी चिपीला जर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळवायचा असेल तर तेवढी जागा हवी म्हणून त्या जागेचे नियोजन करून ठेवा अशी सूचना शरद पवार यांनी नारायण राणे याना केली होती. त्यामुळे ता ठिकाणी पेन्शीलने सूचना घालून ठेवण्यात आल्या होत्या. हि जमीन स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. ती कोणीही हडप करू शकत नाही. असे त्यांनी सांगितले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img