सिंधुदुर्ग – जिल्ह्यात जे चाकरमानी गणेश चतुर्थीसाठी येणार आहेत यांच्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची नाही. ज्यानी दोन डोस घेतले आणि शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी टेस्टची गरज भासणार नाही.
तर एक डोस घेतलाय त्यांनी आरटीपीसीआर करूनच आल पाहिजे अस बंधनकारक नाही. खारेपाटण चेक पोस्टवर आणि रेल्वे स्थानकावर फक्त रॅपीड टेस्ट केली जाणार आहे.
जर काही लोकांनी टेस्ट केली नसेल तर घरोघरी जावून आरोग्य पथक कोरोना टेस्ट करेल. अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र काहीजण उगाचच चाकरमानी लोकांत गैरसमज पसरवत आहेत.
त्यामुळे आता तरी कोणीही गैरसमज निर्माण करू नयेत आणि या गैरसमजावर चाकरमानी लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. झूम अँपद्वारे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक विनंती केलीय की कोरोना अद्याप पर्यंत गेला नाही त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करा.
मास्क व सॅनिटायझर चा वापर करा. जर का कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.