गोव्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी आर.जी पक्षातर्फे” फुलराणी” संघटनेची स्थापना

0
178

 

गोव्यातील स्थानिक महिला विक्रेत्यांचे हक्क आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाने एक सामूहिक पुढाकार घेतला आहे. स्थानिकांच्या उपजीविकेचे रक्षण करणे, त्यांना व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, तसेच परप्रांतीय विक्रेत्याकडून सतत होणाऱ्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी, त्यांना आवाज देण्यासाठी ही संघटना कार्यरत असणार असून, आमची संघटना मासेविक्री, फलविक्री, फुलविक्री, कपडे, खाद्यपदार्थ, किराणा सामान व्यवसायात आणि गोव्याच्या बाजारपेठांमध्ये, रस्त्याच्या कडेला आणि विविध ठिकाणी गुंतलेल्या स्थानिक महिलांची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी समर्पित असणार असल्याचेही आर.जी. पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.

आज राज्यभर परप्रांतीयांमुळे स्थानिक गोवेकर व्यावसायिक, विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. राज्यातील मोठं मोठी बाजारपेठा ह्या परप्रांतीयांनी हडप केलेल्या आहे. स्थलांतरितांच्या ओघाने आमच्या स्थानिक विक्रेत्यांच्या रोजीरोटीला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या टोळीच्या व्यवसायामुळे आपल्या राज्यातील अनेक स्थानिक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थलांतरित विक्रेत्यांकडून स्थानिक विक्रेत्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार वाढत आहे. राज्यात प्रशासनाकडून याबाबत कोणतेही संरक्षण किंवा समर्थन स्थानिक महिला व्यावसायिकांना मिळत नसल्याचेही परब म्हणाले.

*धमक्या विरुद्ध एकजूट*
फुलराणी गोव्यातील सर्व महिला विक्रेते, लहान आणि सूक्ष्म-व्यवसाय मालकांना एकत्र एकाच व्यासपीठावर आणणार आहे. एकत्रितपणे, आम्ही अशा स्थलांतरितांच्या धमक्यांचा सामना करू, व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करू आणि आमच्या महिला उद्योजकांसाठी न्याय सुनिश्चित करू. आमच्या स्थानिक महिला उद्योजकांना समर्थन आणि सक्षम करा. त्यांना धमकावण्याविरूद्ध उभे रहा आणि लहान आणि सूक्ष्म- व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे रक्षण करा अशी विनंतीही मनोज परब यांनी यावेळी गोवेकराना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here