25 C
Panjim
Wednesday, September 28, 2022

गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करा,सावंतवाडी माजगाव वासियांनी वनविभागाकडे केली मागणी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी शिरोडा राज्यमार्गावरील माजगाव पंचम नगर परिसरात शुक्रवारी सकाळी गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. या भागात यापूर्वीही गव्यांचे दर्शन घडले होते. मात्र, दिवसाढवळ्या गवे मुक्तपणे फिरताना दिसल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे यातच गव्यांचा कळप भरवस्तीत फिरताना दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून ही चिंता व्यक्त होत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव नेमळे परिसरात गव्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाकडून जंगल हद्दीवर सौर कुंपण उभारण्यात आले आहे. मात्र असे असूनही अधूनमधून गव्यांचे दर्शन घडतच असते. आता मात्र देगवे दिवसाढवळ्या मुक्तपणे अगदी भरवस्तीत फिरताना दिसू लागले आहेत. अशाच प्रकारे शुक्रवारी सकाळी माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळाच्या समोरील परिसरात दोन गवे मुक्तपणे संचार करीत असल्याचे काहीजणांना दिसून आले.अगदी भरवस्तीत दिवसाढवळ्या दिसून आलेल्या या गव्यांमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.

यापूर्वीही या भागात अनेक वाटसरूंना तसेच वाहनचालकांना गवे दिसून आले होते. या परिसरातील काही अंतरावर असलेल्या मुळगाव घाटीत गवे रेडे मुक्तपणे फिरतानाही आढळले होते. मळगाव घाटीतच एका गाडीला गड्याने धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटनाही घडली होती. या पार्श्‍वभूमीवर दिवसाढवळ्या भर मोकाट पणे फिरणाऱ्या या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांमध्ये होऊ लागली आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img