खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या पहिल्या ट्रेन चे शानदार स्वागत गेली २० वर्षांपासून जनतेची असलेली मागणी अखेर पूर्ण

0
90

सिंधुदुर्ग – गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले तसेच खारेपाटणसह आजूबाजूच्या ४० ते ६० गावांना फायदेशीर व सोयीचे ठरणारे बहुचर्चित व प्रलंबित असे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील चिंचवली येथील कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर आज प्रथमच सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गणपती स्पेशल गाडी थांबविण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे शानदार स्वागत करण्यात आले.

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here