32 C
Panjim
Saturday, December 3, 2022

कार्तिकी एकादशीच्या दिवशीच अपघात, पंढरपूरमध्ये  ५ वारकरी जागीच ठार

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

कार्तिकी एकादशीनिमित्त बेळगावहून पंढरपूरला जात असताना टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील पाच वारकरी ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. एका टेम्पोमध्ये बसून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. या टेम्पोला विटांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला. जखमींचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles