कणकवली हल्ल्यातील मुख्य सुत्रधाराला अटक करा शिवसैनिकांचा कणकवली पोलीस ठाण्यावर धडक

0
138

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक निवडणुकीचे वातावरण आता जिल्ह्यात चांगलंच तापू लागले आहे. आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा बँकेचे मतदार बेपत्ता असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तापसी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, कणकवला . विषय : संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना तात्काळ अटक करणेबाबत … महोदय , मुख्य वरील विषयास अनुसरून शिवसेना कार्यकर्ते तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार श्री संतोष परव यांच्यावर दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करून दहा दिवस उलटले तरी सूत्रधाराला अध्याप पोलीस अटक करू शकले नाहीत. हल्ला करणाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर आता नितेश राणेंना फोन करणार असे म्हटल्याचे फिर्यादी संतोष परब यांनी आपल्या जबाबात स्पष्ट सांगितले आहे . असे असूनही आपण आमदार नितेश राणे यांना फक्त चौकशीला बोलावून सोडून दिले आहे. आमदार नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र असल्याने नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन आपली केंद्रात सत्ता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण राजकीय दबावाखाली तपास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याप्रकरणी मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना तात्काळ अटक करावी तसेच जिल्हा बैंक मतदार प्रमोद वायगणकर गेल्या आठ दिवसापासून तळेरे येथून बेपत्ता असून त्याचाही तपास पोलीस यंत्रणा करू शकली नाही. वरील दोन्ही घटनेबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे त्यात म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर, भूषण परुळेकर, सचिन सावंत, कन्हैया पारकर , नीलम पालव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here