30.1 C
Panjim
Wednesday, March 22, 2023

कणकवलीत ” त्या ” बिल्डिंगमधील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील पहिला कोविड डेल्टा प्लसचा रुग्ण कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन कडील कामत सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये आढळल्यानंतर नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून तातडीने “त्या” कॉम्प्लेक्समधील पहिल्या टप्यात 76 नागरिकांचे आरटीपीसीआर तपासणीकरिता स्वॅब घेण्यात आले होते. हे सर्व स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. त्यामुळे कणकवली शहरवासीयांनी घाबरून न जाता कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. कणकवलीत आढळलेला तो डेल्टा प्लसचा रुग्ण देखील ठणठणीत बरा असून, कणकवली नगरपंचायत, आरोग्य विभागामार्फत सर्व त्या खबरदारीच्या व सतर्कतेच्या उपाय योजना सुरू आहेत. अजून त्या कॉम्प्लेक्समधील 13 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्याचा रिपोर्ट लवकरच येईल. तर काही अजून स्वॅब घ्यायचे आहेत. नगरपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांना सहकार्य करा असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles