कणकवलीत कातकरी कुटुंबियांच्या झोपड्यात घुसले पुराचे पाणी

0
63

सिंधुदुर्ग – कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले. जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने हे पाणी अचानक आले त्यामुळे सुमारे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

 

या कुटूंबाचे धान्य,कपडे,भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला.नदीने रौद्र रूप धारण त्यावेळी वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती.पुरुष मंडळी मंजुरीसाठी बाहेर गेले होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचविला मात्र संसार वाहून गेला.

 

हे वृत्त कळताच अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी निम्मेवाडी येथे धाव घेतली आणि कुटूंबियांना आपल्या घरी आणून आश्रय देत मदत केली

 

कातकरी कुटूंबातील एका महिलेने आणि तीन बालकांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर येत आपला जीव वाचविला.मात्र कातकरी बंधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अन्न धान्य वाहून गेले.

 

खुऱ्याड्याखालील कोंबड्या आणि काही बकऱ्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. यावेळी शैला कदम यांनी या छोट्या मुलांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here