एम टी डी सी ने केलेल्या जिल्ह्यातील सर्वच कामाची चौकशी करा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी

0
126

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात एम टी डी सी ने केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्यास भाजप संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करणार असून, जनतेच्या पैशाची अश्या प्रकारे उधळपट्टी सहन केली जाणार नाही. असा इशारा दिला आहे.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी हा भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. भाजप संजू परब यांच्या सोबत आहे. असे स्पष्ट केले आहे.

आमदार केसरकर यांनी यांनी संपविण्याची भाषा करू नये, ते आपण कधीच सहन करणार नाही. दिपक केसरकर यांचा हाच छुप्पा दहशतवाद असून, हीच तुमची संस्कृती आहे का? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी विद्यमान सत्ताधारी भाजपच्या संपर्कात असून, वेळ आल्यावर त्यांची नाव जाहीर केली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here