32 C
Panjim
Monday, May 16, 2022

आमदार नितेश राणेंची आज पुन्हा पोलीस चौकशी

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात आज मंगळवार २५ जानेवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल 40 मिनिटाहून जास्त वेळ त्यांची चौकशी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासमवेत करण्यात आली. यावेळी आमदार राणे यांच्यासोबत त्यांचे वकील संग्राम देसाई हेदेखील उपस्थित होते.

जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्यावतीने आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि आज तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चौकशी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आमदार नितेश राणे हे तपास कार्याला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. काल सोमवारीदेखील सकाळी आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस स्थानकात दाखल होऊन तब्बल दीड तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. त्या वेळी आमदार नितेश राणे यांनी देखील पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. आज पुन्हा ते कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img