आमदार नितेश राणेंचा सुप्रीम कोर्टानेही जमीन अर्ज फेटाळला

0
85

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक निवडणूक नितेश राणे यांना चांगलीच भोवली आहे.संतोष परब शिवसैनिक हल्ला प्रकरणी 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या प्रकरणामध्येनितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती .या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली आहे.

 

जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद

 

नितेश राणे हे कणकवली पोलिस ठाण्यांमध्ये तीन वेळा चौकशीला सामोरे गेले होते संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांना जी मदत माझी लागेल ते मी मदत करायला तयार आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर राहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर राहावे लागणार आहे. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे

 

काय झालं होतं त्यावेळी

 

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here