असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत आचरेकर यांचे दुःखद निधन

0
123

 

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील असलदे ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते गणपत विष्णू आचरेकर (वय ७५) यांचे बुधवार दिनांक १० मार्चला रात्री १
३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते.त्यामुळे असलदे गावावर शोककळा पसरली आहे.

गणपत आचरेकर यांचा असलदे गावासह पंचक्रोशीत चांगला लोकसंपर्क होता.अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असायचे. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते. असलदे उगवती वाडी येथील ब्राम्हण देव सेवा मंडळ उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.मात्र गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांनी अखेरचा श्वास बुधवारी घेतला.त्यांच्या दुःखद निधनामुळे असलदे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या गावात असलदे तावडेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या ठिकाणी ब्राम्हण देव सेवा मंडळाच्यावतीने त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई ,भाऊ,बहीण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here