29 C
Panjim
Saturday, January 28, 2023

अनधिकृत मच्छिमारीविरूध्द मत्स्यव्यवसाय विभागा आक्रमक दोन परप्रांतीय नौकांना पकडले

- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत मच्छिमारी करणा-या नौकांवर कारवाई करण्याची धडक मोहिम राबविली असून राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात बिगरपरवाना, अनधिकृतपणे मच्छिमारी करताना दोन परप्रांतीय नौकांना पकडले.महिनाभरातील मत्स्यव्यवसाय विभागाची देवगडमधील ही तिसरी कारवाई आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रुद्र मालवणकर व त्यांचे सहकारी पर्यवेक्षक प्रथमेश चव्हाण, सागर सुरक्षा रक्षक हरेश्वर खवळे, धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल, योगेश फाटक, अमित बांदकर या टीमने शीतल गस्तीनौकेद्वारे गस्त घालत असताना देवगड दीपगृहासमोर १३ व १५ वावामध्ये गळ मच्छिमारीद्वारे मच्छिमारी करताना कर्नाटक मलपी येथील विर स्टार व स्वर्ण हनुमान या दोन नौकांना पकडले.

या दोन्ही नौका राज्य शासनाच्या सागरी हद्दीचा भंग करून आत प्रवेश करून मच्छिमारी करताना ही कारवाई केली.

पकडलेल्या दोन्ही परप्रांतीय नौकांना देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाने अवरूध्द केले असून पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती परवाना अधिकारी रुद्र मालवणकर यांनी दिली.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles