सिंधुदुर्ग – संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आम. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा उच्च न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंम्बर रोजी होणार होती. याबाबत उद्या 28 डिसेंम्बर रोजी सुनावणी होणार असल्याची सुनावणी होणार असल्याची माहिती ऍड. रावराणे यांनी दिली आहे. आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आम. नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र उद्या 28 डिसेंम्बर रोजी स्पष्ट होणार आहे.
अटकपूर्व जामिनासाठी आम. नितेश राणे यांची जिल्हा न्यायालयात धाव
