UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या पूर्व तयारीसाठी विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजन सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन

0
130

 

सिंधुदुर्ग – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्य शासना मार्फत निश्चित केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शनिवार दि. २० मार्च २०२१ रोजी सकाळी ११ ते ०१ वाजेपर्यंत होणार आहे.या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक रविवार ७ मार्च २०२१ रात्री १२ वा.पर्यंत आहे. परीक्षेचा निकाल २८ मार्च २०२१ रोजी लागणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम २०२१ साठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक,कोल्हापूर या सहा केंद्रामध्ये एकूण ५४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.यामध्ये देशातील नामवंत प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचे २०० गुण व मुलाखतीचे ५० गुण मिळवून एकूण मिळणाऱ्या गुणांच्या आधारे प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मुलाखतीची वेळ ऑनलाईन परिक्षेनंतर कळविण्यात येणार आहे.याबाबतची सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
तरी सिंधुदुर्ग जिह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरावेत असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here