सिंधु कन्येचे वर्ल्ड रेकॉर्ड, बॅक स्विमिंग करत २० मिनिटात तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम

0
151

 

सिंधुदुर्ग – अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटात तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानपत्र व मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटात विविध 12 प्रकारचे रुबिक क्यूब सोडवण्याचा विक्रम वेंगुर्ला येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील हा विश्वविक्रम करणारी भारतातील ती पहिली किशोरवयीन मुलगी आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया ही संस्था तळागळातील अशा विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच सहकार्य करत आलेली आहे. याबाबत स्नेहा चा या रेकॉर्डची माहिती मिळताच त्यांनी याची तात्काळ दखल घेतली. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या जलतरण तलावाच्या ठिकाणी प्रमाणपत्र, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांच्या मार्फत हा सन्मान करण्यात आला. यावेळी स्विमिंग प्रशिक्षक दीपक सावंत, सुरेंद्र खामकर , राजेंद्र प्रभू साळगावकर, नारायण बर्वे, अमेय रेडकर, मानसी रेडकर, राहुल कांबळे, तुषार परब, स्नेहा चे आई वडील वडील रंजन नार्वेकर व मानसी नार्वेकर, ध्रुव गवंडळकर, स्मिता शिवलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here