सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३१ जानेवारीला कणकवलीत व्यापारी एकता मेळावा दहा हजाराहून अधिक व्यापारी व्हर्चुअल पद्धतीने राहणार उपस्थित

0
90

सिंधुदुर्ग – जिल्हा व्यापारी महासंघ ३४ वा व्यापारी एकता मेळावा कणकवलीत ३१ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.कोरोना काळातील महामारीमुळे नियमानुसार दुसऱ्या वेळी ऑनलाइन पध्दतीने हा मेळावा घेण्यात येणार आहे.या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत,खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे,चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी,सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे,सुनील सौदागर,मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई,विनय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके व कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली.

 

कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार्यवाह राजू जठार, संजय भोगटे, सागर शिरसाट, अरविंद नेवाळकर, तालुका उपाध्यक्ष राजन पारकर, राजू गवाणकर निवृत्ती धडाम, चंद्रशेखर गणपत्ये,दीपक भोगले,संतोष कुडाळकर ,श्रीराम शिरसाट, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कणकवली तालुक्यातील व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्ताने ३१ जानेवारीला सर्व दुकाने,आस्थापना बंद राहणार आहेत.राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग संघटना आहे.ती दरवर्षी व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि एकतेसाठी मेळावा घेत आहे .निमंत्रण पत्रकेत क्यूआर कोड आहे तो स्कँन केल्यावर हा मेळावा ऑनलाईन पाहता येणार आहे,असे श्री.पारकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here