सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भटक्या गुरांच्या मालकावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कारवाई

0
148

 

सिंधुदुर्ग – गुरांच्या मालकांकडून दंड करून व हमीपत्र लिहून घेऊनही वारंवार गुरे मोकाटपणे चरायला सोडली जातात. देवगड नगर पंचायतीने अशा गुरांच्या मालकांवर तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून, देवगड पोलिसांनी गुरांचे मालक अजित सकपाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देवगड पोलिसांनी केलेली ही जिल्ह्यातील पहिली कारवाई असून याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोकाट गुरांचा प्रश्न फारच बिकट बनत आहे. देवगड मध्ये हा प्रश्न भीषण आहे या मोकाट जनावरांची माहिती गोळा करण्यासाठी निलेश श्रीपाद कणेरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते नगरपंचायत देवगड जामसंडे या ठिकाणी गेले तीन वर्षापासून पाणी वितरक म्हणून नोकरीस आहे. त्यांना त्या कामासह पर्यायी काम म्हणून मोकाट फिरणाऱ्या जनावरांची माहिती घेऊन त्या गुरांच्या कानास नगरपंचायत देवगड जामसंडेचे टॅग लावून संबंधित गुरे मालकांना त्यांच्या मालकीची गुरे कोणत्याही रस्त्यावर खाजगी व सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करू नये म्हणून तोंडी सूचना देण्याचे काम देण्यात आले आहे.

मोकाट जनावरांबाबत जिल्ह्यातील दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात असे म्हटले आहे कि, आरोपी अजित पंढरीनाथ सकपाळ. रा. देवगड किल्ला दत्तमंदिर नजीक त्यांची गुरे खबर देणार निलेश श्रीपाद कणेरकर यांना दि. २३ जुलै २०२० रोजी सकाळी १०.३० ते वाजताचे मुदतीत फिरताना सापडल्याने तसा आरोपीकडून दंड रुपये २०० एवढी रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. आरोपीने वरील घटना घडल्यानंतर आपणाकडून गुरासंदर्भात कोणतेही बेकायदेशीर कृत्य न घडण्याची हमीपत्र देऊन सुध्दा वरील तारखेस वेळी व जागी आरोपींच्या मालकीची गुरे सार्वजनिक रस्त्यावर मोकाट स्थितीत सोडून त्या गुराकडून अतिक्रमण करून नुकसानीचे व त्या गुरांमुळे मानवी जीवनास संभावणाऱ्या धोक्यापासून पुरेसा बंदोबस्त न करता हयगयीचे कृत्य केले म्हणून भा द.वि. कलम289, गुरांच्या अतिक्रमणविषयी अधिनियम 1871 कलम 25 दाखल केला आहे.

देवगड पोलिसांनी दाखल केलेला जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा असून, जिल्ह्यात अन्य भागातही आता गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here