सिंधुदुर्गात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले प्रतिबंधात्मक आदेश

0
72

सिंधुदुर्ग – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिनांक 9 मे रोजी रात्री 12 ते दिनांक 15 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जरी केले आहेत.

काय आहे आदेशात ?

सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने ( कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा ( Home Delivery) सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीतच चालू ठेवणेस परवाणगी राहील. आंबा वाहतूकीस परवानगी राहील – वाहतुकी दरम्यान कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरिता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे.

अन्यथा होणार कारवाई

सदर रास्त भाव दुकान, आंबा वाहतूक व शिवभोजन केंद्र याठिकाणी कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here