संजय राऊत नेहमी बडबड करतात ना मग जावूदेना जरा ईडीच्या समोर – नारायण राणे

0
223

 

सिंधुदुर्ग – भाजप ईडीचा वापर करत नाही केंद्र सरकारच्या अंडर ईडी आणि सिबीआय आहे. पुरावे असल्या शिवाय ईडी आणि सिबिआय कोणाची चौकशी करत नाही. त्यामुळे त्यांनी PMC बँकेत गैर व्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता किती कोटीची आहे, आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे मग एक कोटीला कशीकाय मिळाली? आणि मग एक कोटीच कर्ज दाखवायला म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले आणि म्हणून ईडीने ही नोटीस दीली असचं कोणी ईडी वैगेरे नोटीस देत नाही. त्यांना बीडी प्यायला लावतात. अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठविलेल्या नोटीसीचं समर्थन केलं आहे.

काय आहे प्रकरण?

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं.

वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here