लसीकरणाचे ग्लोबल टेंडरसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून १२ टक्के कमिशन मागितले – नारायण राणे

0
102

सिंधुदुर्ग – भाजप नेते नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चक्रीवादळानंतरच्या कोकण दौऱ्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन काय पाहिलं असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. तर राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून भाजप खासदार नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून कमिशन म्हणून टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराकडून १२ टक्के कमिशन मागितले गेल्याचा आरोप केला आहे. तर काळ माझ्याकडे तक्रार आली पोलीस हौसिंगच्या इमारत बांधकाम प्रोजेक्ट्मध्ये १५ कोटी रुपये एका अधिकाऱ्याने मागितले असेही ते यावेळी म्हणाले.

खासदार संभाजी राजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून भाजपचे खासदार नारायण राणेंनी राज यांना चिमटे काढलेत. म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. संभाजी राजे फिरतायत ना नवीन नेते आता होतायत ना होवू देत असा टोला देखिल नाराय़ण राणेंनी लगावलाय. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही असं विधान काही दिवसापुर्वी संभाजी राजे यांनी दिलं होतं. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं विधान करणं, मराठा समाज्याला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी बीजेपी सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरताय त्यांनी काय केलं. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं. मराठा आरक्षणा संदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.

मराठा समाज्याला आरक्षण मिळावं यासाठी भाजपचे नेते राज्याचे दौरे करतायत. सरकारने आता जो प्रस्ताव पाठवयाचा आहे तो अभ्यासपुर्ण असला पाहिजे. त्यासाठी चांगले वकिल आणि सुप्रिम कोर्टाने नाकारले मुद्दे आहे त्याला धरून योग्य प्रस्ताव गेला पाहिजे तसा प्रस्ताव भाजप तयार करतय आणि त्यासाठी भाजपने काही वकिलांची नेमणुक केली गेल्याची माहिती भाजपचे खासदार नारायण राणेंनी दिलीय. भाजपाकडून या संदर्भातील प्रस्ताव सादर करून विरोधीपक्ष नेते मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर करतील अशी माहिती नारायण राणेंनी पत्रकार परिषदे दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here