राणेंच्या हातातील कुडाळ देवगड नगरपंचायती गेल्या राणे समर्थकांच्या गोटात खळबळ

0
118

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन नगरपंचातींपैकी एक नगरपंचात भाजपाला राखण्यात यश आले आहे. कुडाळची नगरपंचायत एका मताने गेल्याने राणे समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कुडाळ मध्ये भाजपचा निसटता पराजय

आमदारकी शिवसेनेकडे असल्याने तसेच जिल्हा बँक निवडणूक चुरशीची झाल्याने जिल्हावासियांसह राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. परंतू या निवडणुकीत भाजपाला एका मताने आणि एका जागेने सत्तेपासून दुर केले आहे.
कुडाळमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. १७ जागांच्या या नगरपालिकेत भाजपाला यंदा ८ जागाच जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. यामुळे काँग्रेस या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता

वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे. एकूण १२ जागांपैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून २ जागांवर शिवसेना आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत, भाजपा 8 महा विकास आघाडी 9

देवगड नगरपंचायतमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवत देवगड जामसंडे नगरपंचायतची सत्ता आपल्याकडे राखली आहे. भाजपाला केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांचा पराभव हा भाजपासाठी धक्का मानला जात असून भाजपच्याच माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांनी मात्र विजयश्री खेचून आणून आपला गड राखला आहे. एकंदरीत शिवसेनेच्या आठ व राष्ट्रवादीचा एक अशा एकूण 9 जागा जिंकत देवगड मध्ये महाविकास आघाडीने भाजपाला पर्यायाने आमदार नितेश राणे यांना धक्का दिला आहे.

दोडामार्ग भाजपकडे, दीपक केसरकरणा धक्का

दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपने 14 जागा, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1जागा जिंकली आहे. या निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांना जबर दणका बसला आहे.

महाविकास आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन करणार

शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यावेळी बोलताना म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. वैभववाडी देवगड नगर पंचायतीमध्ये महा विकास आघाडीच्या उमेदवारांना निर्विवाद सत्ता मिळाली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या ठिकाणी देखील महा विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणार आहोत असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here