मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली,काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

0
82

 

वाऱ्याचा घटलेल्या वेगामुळे हवेत तरंगणाऱ्या सुक्ष्मकणांचे प्रमाण वाढले असून, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील अनेक भागांमधील हवेची गुणवत्ता रविवारी खालावली होती. अनेक भागांमध्ये हवा धुरकट झाली होती. ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅड व्हेदर फोरकास्ट अ‍ॅड रिसर्च’ (सफर) संस्थेने केलेल्या नोंदीनुसार माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी पूर्व, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता वाईट असल्याचे नोंदवण्यात आले. वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे अतिसूक्ष्म धुलीकण वातावरणाच्या वरच्या भागांत तरंगत राहतात. दुपारी वाऱ्याचा वेग काहीसा वाढतो त्यामुळे दुपारी हे धुलीकण उडून जातात. मात्र, सकाळी आणि सायंकाळी, रात्री वारा कमी झाल्यामुळे धुलीकण तरंगत राहिले. त्याचबरोबर वातावरणही ढगाळ होते त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली होती. हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी या हवेत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सफरने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here