महाराष्ट्र विधानसभेचे १ दिवसीय अधिवेशन; २८७ आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू

0
162

 

आज विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर २८७ आमदारांना शपथ देत आहेत. सकाळी ८ वाजतापासून हा शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. त्यासाठी विधानभवनात आमदार येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शपथ घेतली.

बाळासाहेब थोरात, जयंत पाटील ,अतुल सावे, यशोमती ठाकूर, माधुरी मिसाळ, प्रणिती शिंदे, योगेश सागर, राणा जगतसिंह पाटील, विद्या ठाकूर, अमित देशमुख, प्रकाश भारसाखळे, दीपक केसरकर, संजय कुटे, रविंद्र वायकर, रविंद्र चव्हाण, दादाजी भुसे, संजय राठोड, गुलाब पाटील, मदन येरावार, रवि पाटील, संजय सावकारे, रणजित कांबळ, धर्मराव बाबा आत्राम, विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंकी, उदय सामंत, तानाजी मुटकुळे, चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, सुनिल केदार, गणपत गायकवाड, सुभाष देशमुख, आशिष शेलार, अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, एकनाथ शिंदे, जयकुमार रावल, सुरेश खाडे, विखे पाटील, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, बबन लोणीकर,  हसन मुश्रीफ, भास्कर जाधव, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंदे, गणेश रामचंद्र नाईक, प्रकाश कल्लप्पा आव्हाडे आणि नवाब मलिक आदींनी आतापर्यंत शपथ घेतली आहे.

सुप्रिया सुळे आमदारांचे स्वागत करण्यासाठी विधानभवनात पोहोचल्या आहेत, तर ‘आगे-आगे देखो होता हैं क्या’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्यासोबत दिलीप वळसे-पाटील देखील होते. महाराष्ट्रातील सत्तेचा पेच शेवटी सुटला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याचे निश्चित झाले आहे. मंगळवारी तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. आता गुरुवारी उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांना शपथ देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here