महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील अतिक्रमणावर कारवाईचा कार्यकारी अभियंत्यांचा यांचा इशारा महामार्गाचे दुभाजक तोडल्यास गुन्हा दाखल होणार; महामार्ग प्राधिकरणचा तो बॅनर जाळण्याचा कणकवलीत प्रयत्न

0
105

सिंधुदुर्ग – शहरातील महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असतानाच आता या अतिक्रमणधारकांना महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता यांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महामार्गाच्या हद्दीत व्यवसाय करणे, अतिक्रमण करणे, महामार्ग वाहतुकीला अडथळा निर्माण करणे ही बेकायदेशीर कृत्य असून अतिक्रमण हटविण्यासाठी प्रति चौरस मीटर 500 रुपये दंड व अतिक्रमण हटविण्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्याचा इशारा कार्यकारी अभियंत्यांना कडून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग (जमीन व रहदारी) अधिनियम 2002 मधील कलम 24, 26, 31, 37 व 39 नुसार राष्ट्रीय महामार्ग हद्दीत विनापरवाना वाहने उभी करणे, महामार्गाच्या हद्दीत व्यवसाय करणे, महामार्गाच्या वाहतुकीस अडथळा व अतिक्रमण याची पुनरावृत्ती झाल्यास हा दखलपात्र गुन्हा असल्याची नोटीस दर्शविणारा फलक कार्यकारी अभियंत्यां कडून कणकवलीत लावण्यात आला आहे.

या संदर्भात कारवाईचा इशारा देत कार्यकारी अभियंत्यांनी याप्रकरणी येत्या काळात कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच महामार्गाचे दुभाजक खंडित केल्यास सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण करण्यात येईल.

या गुन्ह्याला पाच वर्षांपर्यंत कैद व दंडाची देखील शिक्षा असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी या नोटीस द्वारे इशारा दिला आहे. त्यामुळे कणकवलीत येत्या काळात महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान महामार्ग प्राधिकरण कडून लावण्यात आलेल्या या बॅनर ला आज्ञाता कडून जाळण्याचा ही प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here