नाकाड्या चापडा हंप नोड पिट व्हायपर या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची सिंधुदुर्गात झाली नोंद

0
426

 

सिंधुदुर्ग – नाकाड्या चापडा हंप नोड पिट व्हायपर या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची केर – मेकुर्ली भागात पहिलीच नोंद झाली असून बहुदा सिंधुदुर्गातील ही पहिलीच नोंदही असावी. वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, तुषार देसाई व उदय सातार्डेकर है हती निरीक्षणासाठी गेले असता त्यांच्या दृष्टीस ही दुर्मीळ प्रजात पडली.

पश्चिम घाटातील तिलारी परिसर हा जैवविविधतेने संपन्न असा भाग असून या मागात वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि संशोधनासाठी कार्यरत आहेत. वन्यजीवांचे अस्तित्व आणि घडामोडी यासंबंधात विविध भागातील माहिती गोळा करून ती सर्वसामान्यांना अवगत होणे गरजेचे आहे. तिलारी परिसर हा पश्चिम घाटातील जैवविविधतेत अग्रक्रमीत असल्याने या मागातील जैवविविधतेवर संशोधनही होणे फार गरजेचे आहे.

केर हे गाव दोडामार्ग तालुक्यात दुर्मीळ जैवविविधता संपन्न परिसर असून येथे दुर्मीळ फुलपाखरे, सरिसृपांच्या प्रजाती, सस्तन प्राणी तसेच प्रदेशनिष्ठ वृक्ष आणि विविध पक्षांचे आश्रयस्थान आहे. २९ मे रोजी वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्गच्या माध्यमातून संजय सावंत, तुषार देसाई व उदय सातार्डेकर हे केर-मेकुली येथील हती भ्रमण मार्गातील अभ्यासासाठी गेले असता भर रस्त्यात हंप नोज्ड पिट व्हायपर अर्थात नाकाड्या चापडा अंगाचे वेटोळे करून त्याच्या विशिष्ट शैलीमध्ये बसला होता. प्रचमता बघितल्यानंतर तो जखमी अवस्थेत असेल

विषारी सापांमधे जगभरात प्रसिद्ध असलेला वर्ग म्हणजे तो व्हायपर सापांचा अत्यंत दुर्मीळ घटनेत, दोडामार्ग केर-मेकुर्ली येथे सापडलेला नाकाड्या चापड़ा, कुबडा-नाक असलेला “हंप नोज् पिट व्हायपर ही विषारी प्रजातींची विषारी प्रजाती आहे, जी दक्षिण पश्चिम भारत आणि श्रीलंका येथील स्थानिक प्रजाती आहे. यांचे लांबलचक सुळेदात भक्ष्याच्या शरीरात खोलवर दंश करून आतपर्यंत विष सोडतात. हे विष सहसा रक्तमिसरण संस्था आणि स्नायुंवर अंमल करते. यांचे शरीर जाडसर असते, लांबी सहसा कमी असून डोके काहीसे चपटे आणि त्रिकोणी असते. या सापांमधे सापांच्या तोंडावर असणारी दोन उष्णता संवेदनाग्रहण करणारी छिद्रे आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताचे सस्तन प्राणी, पक्ष्यांची हालचाल सहज टिपू शकतात. आपले डोके आजूबाजूला फिरवून आणवणान्या उष्णतेप्रमाणे ते मध्याची योग्य दिशा सहज ओळखतात. हे साप दिसायला

पकडण्यासाठी मात्र झपाट्याने त्यावर हल्ला चढवतात. उंदीर घुशीसारखे छोटे सस्तन प्राणी, पाली, सरडे, बेडूक हे त्यांचे मुख्य अन्न असते. या जातीचे साप थेट पिल्लांना जन्म देतात. आत्तापर्यंत आपल्या भागात दिसणारा हिरवा चापडा किंवा बांबू पिट व्हायपर अनेक वेळेला मलबार पिट व्हायपर हे साप देखील घनदाट अरण्यात आढळतात. आपल्या महाराष्ट्रातील काही खास ठिकाणे आणि दक्षिणेकडच्या जंगलात हे सर्रास आढळतात.

त्याच कुळातील हंप नोज्ड पिट व्हायपर किया मराठीमधे याला नाकाड्या चापड़ा असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. याचा रंग लालसर तपकीरी डोके मानेपासून वेगळे झालेले सहज ओळखता येते. त्याचे नाक काहीसे वरच्या बाजूला वाढलेले असते आणि त्यामुळे त्याच्या नाकावर डेंगूळ आले आहे, असे मासते आणि म्हणूनच हा हंम नोज्ड पिट व्हायपर म्हणून ओळखला जातो. याच्या शरीरावर गडद तपकीरी किंवा राखाडी रंगाचे त्रिकोणी धब्बे असतात. इतर पिट व्हायपर सारखा मात्र हा झाडावर न राहाता खाली जमिनीवरच आढळतो.

जरी सुस्त असलेतरी मल्याला साधारणत: पालापाचोळ्यामध्ये झाडांच्या मुळामधे, दगडाखाली हा अतिदाट जंगलांमधे आढळतो. उत्तेजीत झाल्यावर तो आपली लालसर पिवळसर उठावदार रंगाच्या शेपटीची जोरदार हालचाल करतो. त्याच्या मल्याला आकर्षित करण्यासाठीसुद्धा त्याला या सवयीचा उपयोग होतो. यापूर्वी हा साप चोर्ला घाट, गोव्यातील केरी सत्तरी भाग तसेच ठराविक उंचीवर आढळून आला होता, येथील ही पहिलीच नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here