केपे (प्रतिनिधी):दुर्गादेवी युथ कल्ब गोकुल्डे आयोजीत लक्ष्मीपूजन निमीत देणगी कुपन निकाल सोहळ्यास आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मीपूजन सोहळ्यानिमित्त १२ नोव्हेंबर २०२६ रोजी केपे मतदारसंघाचे आमदार श्री. अल्टन डिकॉस्टा (Alton D’Costa) यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत मोरपिला पंचायतीचे उपसरपंच (डेप्युटी सरपंच)प्रकाश अ. वेळीप, तसेच बार्से पंचायतीचे पंच श्री. सर्वानंद वेळीप , क्ष्वेता वेळीप, बार्से पंचायतीचे माजी सरपंच मालू वेळीप हे देखील उपस्थित होते. सर्वांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या सोहळ्याला गावचे बुधवंत, वेळीप आणि अन्य मानेली तसेच क्लबाचे अध्यक्ष सुनय वेळीप व अन्य सभासद हे मान्यवर देखील उपस्थित होते.



