दीर्घ कालाची भक्तीपरंपरा लाभलेला • जुवलिकर नाईक परिवार

0
210

श्री गणेशोत्सव हा कोकण आणि गोव्यांचा अत्यंत महत्वाचा सण होय. पाऊसकाळाच्या सुरुवातीचा वर्षाव थोडा ओसरल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतलेली असते आणि सौम्य रूप धारण केलेले असते अशा वेळी शेतिभातीची कष्टाची कामे उरकून कष्टकरी शेतकरी श्री. गणेशोत्सवाचा मनसोक्त आनंद घेत असतो. गोव्यात आजही अनेक कुटुंबात मुख्य घरात श्री गणपती पूजन करून सर्व कुटुंबियांनी एकत्र येण्याची अतीशय सुंदर परंपरा आहे. नोकरी-व्यवसाय निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या सर्व कुटुंबियानी एकत्र येण्याचा हा एक आनंद सोहळा असतो.

बोरी या छोटयाशा खेड्यातील पाणीवाडा येथील जुवलीकर नाईक परिवारात ही परंपरा शतकोत्तरी वर्षानंतरही अखंडपणे सुरु आहे. आज या पुजन परंपरेला सुमारे ११२ वर्षे पूर्ण होते आहोत. बारा पिढयानी श्री गणेश पुजनाच्या ह्या पर्वणीला एक वैभवशाली परंपरा प्राप्त करून दिली आहे. सुरुवातीच्या जुवलीकर नाईक परिवारातील पूर्वजांनी आपल्या कष्टकरी जीवन पध्यतीत ह्या पूजनाची मुहूर्तमेढ रोविली. पिढी-दरपिढी परिवाराचा विस्तारही होत गोला • नाईक परिवारातील अनेक कर्तृत्ववान मंडळी वेगवेगळ्या शेत्रात नावारुपाला आली आहेत जुवलीकर नाईक परिवाराची अनेक घरे पाणीवाडा -बोरी इथे पसरली आहेत. आजही सर्व कुटुंबिय एकत्र येऊनच श्री गणेशपूजनाचा उत्सव करत असतात.

नव्या पिढीतील तरुण मुलांना घ्या वैभवशाली परंपरेची महिती आणि महत्व कळणे आवश्यक आहे. या पुढील काळात ह्या परंपरेचे आपण पायिक आहोत याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here