जिल्हा पोलिस दबावाखाली, अनैतिक व अवैध धंद्यांना त्यांचा पाठिंबा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप

0
108

सिंधुदुर्ग – जिल्हा पोलिस दबावाखाली काम करत आहेत. त्यातूनच त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. असा आरोप करताना या पोलिसांचा अनैतिक आणि अनधिकृत धंद्यांना पाठिंबा आहे. त्याची पोलखोल भाजपा करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

शिवसेनेला पोलीस सॉफ्टकॉर्नर देतअसल्याचा आरोप

सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दबावाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. जिल्हा पोलीस अनैतिक व अनधिकृत धंद्यांना पाठिंबा देत आहेत. ओरोस येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर माजी खासदार निलेश राणे यांच्या पुतळ्याबाबत घटना घडत होती तेव्हाच पोलिसांनी अडवले असते तर आज जिल्ह्यात वाद चिघळला नसता असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले आहेत. जिल्हयात शिवसेनेला पोलीस सॉफ्टकॉर्नर देत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

केवळ गुन्हा भाजपावरच का, तेली यांचा प्रश्न

जिल्ह्यात शिवसेनेने माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाने खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळला होता. मात्र जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली उद्या सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर पुतळे दोन्ही बाजूच्या लोकांनी जाळले मात्र गुन्हा भाजपावरच का असा प्रश्न तेली यांनी यावेळी केला आहे.

पुतळा जाळपोळ प्रकरणी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राणे शिवसेना राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या 28 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवली मध्ये 19 तर कुडाळ मध्ये 9 भाजप कार्यकर्तेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. द. वि. कलम 143, 149, 285 महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात राणे शिवसेना राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here