छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कर्नाटक शासनाचा शिवसेनेकडून जाहीर निषेध

0
108

सिंधुदुर्ग – कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकत महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. या प्रकरणी तालुका शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटक शासनाचा प्रतिकात्मक पुतळा तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कर्नाटक शासनाने काढून टाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन:श्च सन्मानाने त्याठिकाणी बसवून संपूर्ण शिवभक्तांची व महाराष्ट्र वासियांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यामध्ये येण्याच्या अगोदर कर्नाटक शासनाने छत्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी सर्वप्रथम आपले मत व्यक्त करावे आणि यानंतर छत्रपतींच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करावा असे आवाहन केले आहे. उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नितीन वाळके, महेश कांदळगावकर यांनीही कर्नाटक शासनाचा निषेध नोंदवला व समस्त शिवसैनिकांची निषेधाची भूमिका कर्नाटक शासनापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राउत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोहोचवू असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नगरसेवक नितीन वाळके, यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, अनंत पाटकर, आतू फर्नांडिस, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, बंड्या सरमळकर, नरेश हुले, दिपा शिंदे, निलम शिंदे, किरण वाळके, राजू परब, प्रवीण रेवंडकर, रवी तळाशिलकर, विद्या फर्नांडिस, भुषण कासवकर, विशाल सरमळकर, अल्पेश वराडकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here