गोव्यात कोरोनाने आणखी ५८ जणांचा मृत्यू, १ ते १५ मे पर्यंत ८७३ बळी

0
106

 

सिंधुदुर्ग – गोव्यात कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचे तांडव काही थांबायला तयार नाही. शनिवारी दिवसभरात गोव्यामध्ये आणखी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ ते १५ मे पर्यंत ८७३ बळी गेला आहे. गोव्यातील आतापर्यंतचे कोविडबळी २०५६ आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत ३५१२ जण करोनामुक्त झाले आहेत अशी माहिती गोवा सरकारच्या मेडिकल बुलेटिन मधून देण्यात आली आहे. तर विरोधी पक्ष वा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विजय सरदेसाई यांनी केली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काल शुक्रवारी रात्री गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 8 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला आहे. तर गेल्या 5 दिवसात गोवा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरदेसाई म्हणतात की, गोवा राज्याचे 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 300 कोटींचा विशेष सहाय्यता निधी जाहीर केला. ज्याचा उत्सव राज्य सरकारनेही सुरू केला होता. परंतु या उत्सवांसाठी 300 कोटी मिळू शकतात, तर कोविड काळात केंद्र सरकारने गोव्यास मदत का केली नाही असा प्रश्न सरदेसाईंनी उपस्थित केला आहे.

१ ते १५ मे या कालावधीत तब्बल ८७३ जणांचा करोनामुळे मृत्यू

शनिवारी सिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. १ ते १५ मे या कालावधीत तब्बल ८७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बळींच्या वाढत्या आकड्यांमुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या २०५६ झाली आहे. करोनाबाधितांचा आकडा घटत असल्याने राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ३६.२७ टक्क्यांवर आला आहे. तर याच आकडेवारीमुळे करोनामुक्त होणाऱ्यांचा दर वाढून ७५.०६ टक्के झाला आहे. राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या ३०,७७४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा १,३४,५४२ वर पोहोचला आहे. त्यातील १,०१,७१२ जणांनी करोनावर यशस्वी मातही केली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे १,९५७ नवे रूगन आढळले आहेत. आजच्या दिवशी रुग्णालयात २३,९११ रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आज २४२ नव्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये ८७,५९९ रुग्ण आहेत. तर आज शनिवारी १७४५ नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. गोव्यात आतापर्यंत ७,५३,२७१ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात ५,५७१ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here