गोवा राज्याने तपासणी नाकी खुली केली असली तरी बांदा, आरोंदा व सातार्डा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची थर्मल गन तपासणी करण्याचा प्रशासनाचा विचार

0
141

सिंधुदुर्ग – गोवा राज्याने तपासणी नाकी खुली केली असली तरी गोवा राज्यातून येणाऱ्यांना सावंतवाडी तालुक्यातील बांदा पत्रादेवी, आरोंदा व सातार्डा तपासणी नाक्यावर थर्मल गनने तपासणी करावी अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची कोविड नियमावली संध्याकाळ पर्यंत जाहीर होणार आहे

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, गोवा राज्याने सिमा खुल्या केल्या आहेत, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची थर्मल गन तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी नियमावली जाहीर करतील अशी शक्यता आहे.सध्या तरी तपासणी बंद केलेली नाही असे ते म्हणाले.

गोवा राज्याने रात्री १२ वाजल्यानंतर सर्व सीमा खुल्या केल्यानंतर सिंधुदुर्ग सीमा कधी खुल्या होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी व नोंदणी सुरू होती. गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना आता विनाअट प्रवेश सुरू करण्यात आला आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सीमेवरील नाक्याला भेट देऊन पाहणी केली.

तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग मधून गोवा व गोव्यातून सिंधुदुर्ग असा प्रवास विनाअट पूर्ववत सुरू झाला आहे. त्यामुळे गोव्यात रोजगारासाठी दररोज ये-जा करणाऱ्यांना आता सोपे होणार आहे. अद्याप महाराष्ट्र शासनाच्यावतीने अधिकृत पत्रक काढण्यात आले नसले तरीही वाहतूक सुरु झाली आहे. संध्याकाळ पर्यंत याबाबत शासनस्तरावर अधिकृत निर्णय होईल असे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्रादेवी येथे तपासणी नाका भेटी दरम्यान सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here