गोवा बोर्डाच्या परीक्षेसाठी सिंधुदुर्गत परीक्षा केंद्र, राजन तेली यांची माहिती

0
124

 

सिंधुदुर्ग – गोवा शिक्षण मंडळाने दहावी व बारावाची परीक्षाची तारीख जाहीर केली असून सदर परीक्षा 21 मे पासून होणार आहे. गोव्यातील शाळांमध्ये सिंधुदुर्ग सीमाभागातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सीमावर्ती भागात परीक्षा केंद्र उभारू असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

कोरोनाचे रुग्ण मिळाल्यामुळे जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. गोव्यात गोव्याशिवाय बाहेरील व्यक्तींना प्रवेशास मनाई आहे. या परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षा कसे देणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी 8 रोजी गोव शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले  असून सदर परीक्षा 21 मे पासून सुरू होणार आहे. सिंधुदुर्गातील एक हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी दहावी, बारावीत शिक्षण घेत आहेत.

गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक, औद्योगीक संस्थामंध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा, मडुरा, नेतर्डे, डिंगणे, सातार्डा, सातेसे, कवठणी, साटेली, आरोस, शेर्ले, वाफोली, डेगवे, दोडामार्ग, मणेरी, भेडशी, सासोली, किनळे, आरोंदा, रेडी आदी सीमाभागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्य म्हणाजे या विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था गोवा शासनकाडून विनामूल्य होती. गोव्याचे आकर्षण म्हणून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. काही शाळांमध्ये गोव्यातील शाळेतील पटसंख्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास खर्च, लॅपटॉप आदी आमिषे दाखवून आपल्या शाळेत प्रवेश दिला होता. दरम्यान गोव्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता सिंधुदुर्ग जिह्यातील सीमाभागातील काही शाळांना आगामी काळात कुलुप लागणार आहे. त्याबाबत काही दिवसापूर्वी संस्थाचालकांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन देत शाळा वाचण्यासाठी प्रयत्न करा, असे पत्र दिले होते. आता गोव्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि या विद्यार्थ्यांवर भवितव्याची टांगती तलवार लटकू लागली. याबाबत राजन तेली यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बोलून हा प्रश्न मिटवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here