कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्यकर्मचाऱ्यांचे जि.प.समोर ठीय्या आंदोलन

0
110

सिंधुदुर्ग – कोरोना कालावधीत कामकेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून शासनाने कमी केल्यानेकोव्हीड योध्दा म्हणुन झालेली नियुक्ती अनुषंगाने शासकीय सेवेत कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठीया कर्मचाऱ्यानीबुधवारी जि.प.समोर ठीय्या आंदोलन करून लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोव्हीड सेंटर उभारण्यात आली. सदर कोव्हीड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचा-यांना कोव्हीड योध्या म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती. या कालावधीत कोरोना योध्दा म्हणुन कोरोनाची भिती न बाळगता २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते.

परंतु कोरोना काळात काम करुन देखील कोणतीही पूर्व सुचना न देता दि. ३१.०८.२०२१ पासुन शासनाकडून काम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्याना धक्का बसला त्यामुळे कोरोना काळात काम केल्याने कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी ठीय्या आंदोलन सुरु केले आहे.यामध्ये अमित वजराटकर ,प्राजक्ता माळवदे,सुभेधा गावकर ,रेश्मा नायर हार्दिक कदम, सुशात धुरी, गिरीधर कदम प्रमोद कलींगणलक्ष्मण वरवडेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

राज्य सरकारने कोरोना प्रभाव काळात जिल्ह्य़ातील २७२ कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्याच्या विविध विभागामार्फत कोवीड योद्धा म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.आणी अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता. ३१ ऑगस्ट २०२१पासुन त्यांची सेवा समाप्तीचे आदेश काढून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अत्यंत कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावली होती.याचा प्रशासनाला विसर पडला.असुन या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे.त्यामुळे या सर्व कोवीड योद्धयांनी शासनाकडून आपल्या सेवा समाप्तीचे दिलेले आदेश तात्काळ रद्द करून पून्हा सेवेत सामावून घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून कोवीड योद्ध्याच्या मागण्या ह्या रास्त आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेशी सहमत असून आपणास योग्य न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तातडीने उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार.व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधून अन्याय झालेल्या सर्व कोवीड योद्धयांच्या मागण्या मान्य करून या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासबाब म्हणून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here