काजूला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीची स्थापना 15 फेब्रुवारीला होणार उद्घाटन ; जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

0
75

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील काजूच्या चवीला जागतिक दर्जा मिळवून देणे ही सिंधुदुर्ग वासीयांची जबादारी आहे म्हणून कोणीतरी ही जवाबदारी घेणे गरजेचे असल्याने सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. ह्या कंपनीचे अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन 15 फेब्रुवारीला माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले..

दरवर्षी काजूच्या दाराच्या बाबतीत अडचण निर्माण होते आहे ती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीची स्थापन करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जे काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जीआय मानांकन देऊन जीआय मानांकन मिळालेल्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळवून देणे हे प्रोड्युसर कंपनीची जवाबदारी राहणार आहे तर काजू बाबतीत एक छताखाली मार्गदर्शन मिळेल काजूच्या फवारणीसाठी लागणारी फवारणीची औषध याचे खर्च देखील कमी करण्याचे प्रयत्न कंपनीचे राहतील केंद्र आणि राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here