कणकवली हल्ल्याचा शिवसेनेवर उलटा आरोप करणारे नितेश व निलेश राणे बालिश – आमदार दीपक केसरकर

0
105

सिंधुदुर्ग – कणकवली येथे शिवसेना कार्यकर्त्यावर झालेला हल्ला हा भ्याडपणाचे लक्षण आहे. हल्ल्याचा शिवसेनेवर उलटा आरोप करणारे आमदार नितेश व निलेश राणे हे दोघे बालिश आहेत.

 

त्यामुळे आता आगामी काळात होवू घातलेल्या निवडणूकांमध्ये पुन्हा दहशतवादाला येथील जनतेने सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले.

 

दरम्यान निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक व पदाधिकारी मतदारांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी जिल्ह्याबाहेर जावे, असेही ते यावेळी म्हणाले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.केसरकर बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका निर्भयपणे होण्यासाठी प्रशासनाने देखील खबरदारी घ्यावी. जिल्हा बँकेतील मतदार हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संरक्षण देणे शक्य नाही, म्हणून पोलिसांनी मतदारांची यादी घेतली आहे. पोलीस याकडे लक्ष ठेवून निर्भयपणे मतदान करण्यास पुढाकार घेतील.

 

त्यामुळे मतदारांनी आमिषाला बळी पडू नये. आमदार नितेश राणे व निलेश राणे हे बालिश आहेत. ते पत्रकार परिषदांमधून भडक वक्तव्य करतात. ते पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आहे. कै.अंकुश राणे यांचा खून झाला त्यावेळी खासदार संजय राऊत व वैभव नाईक यांचे नाव या लोकांनी घेतले होते. फक्त पोलीस यंत्रणेचे लक्ष विचलित करण्यासाठी, असे आरोप केले जातात. पोलिसांनी अशा बालीश आरोपांकडे दुर्लक्ष करून कटकारस्थान करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here