असलदे गावच्या ओसाड माळावर “त्याने” फुलविली काजू बाग, जमीनदारांनाही मिळाला चांगला रोजगार

0
321

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या असलदे गावच्या शेकडो एकर जागेवर कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून ताड तेलाच्या झाडांची लागवड करण्यात आली. ८० च्या दशकात स्थानिकांच्या जमिनी वर्षाला २ रुपये एकर दराने भाडेपट्यावर घेण्यात आल्या. ओसाड असलेल्या या मळाला शासनानेही कवडीमोल दर दिला. आता याच माळावर असलदे येथील तरुण पंढरी वायंगणकर यांनी काजूची बाग फुलविली आहे. पंढरी वायंगणकर हे जमीनदारांना वर्षाला एकरी ३ हजार रुपये भाडे देतात. कोकण विकास महामंडळाचा करार संपण्या आधीच ताड तेल प्रकल्प बंद पडला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ताडाच्या झाडाखाली अडकून पडल्या. मात्र याच जमिनी आता पंढरी वायंगणकर यांच्यासारखे तरुण साफ करून त्यात बागायती फुलवत असल्याने येथील शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा नवा मार्ग सापडू लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here