अननसाच्या लागवडीतून वर्षाला 1 कोटी 52 लाख रुपये मिळवले…

0
431

 

प्रत्येक व्यक्तीकडे ध्येय ,जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे याचे उदाहरण म्हणजे,सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील “पाळीये” या मूळ गावी राहणारे प्रगशील शेतकरी सुरेश दळवी यांनी एकशे पन्नास एकर क्षेत्रात अननसाची लागवड केली आहे.मात्र गेले सहा वर्षापासून पॅरॅलीसिस या दीर्घ आजाराशी संघर्ष करतायत.पण मनाकडे जिद्द ,चिकाटीच्या मनाशी बाळगत दळवी हे अननसाच्या लागवडीमध्ये यशस्वी झाले आहेत.

सुरेश दळवी हे शेतकरी गेले पंधरा वर्ष अननसाची लागवड पडीक जमिनीमध्ये करत आहेत. 150 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अननसाची यशस्वी लागवड केली आहे. मात्र काही वर्ष त्यांना फारसं मोठं यश मिळालं नव्हतं. त्यांना मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात त्यांना मोठा फटका सहन करावा लागला होता.त्यांना स्वतःला शेतांमध्ये फेरफटका मारता येईना. जिद्द न हरता मजुरांच्या जीवावर व्यवसाय सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी केरळ मधील लोक माझ्याकडे अननसाची लागवड करण्यासाठी जमीन मागण्यासाठी आले होते.ते भाड्याने जमीन मागत होते. परंतु त्या लोकांचं मी काही न ऐकता केरळमध्ये अननसाची लागवड कशी करतात याची माहिती घेण्यासाठी मी केरळ या राज्यात गेलो. आणि अननसाची लागवड कशी करतात त्याची मी संपूर्ण माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर ही अननसाची लागवड कोकणात सुद्धा होऊ शकते असा माझा आत्मविश्वास निर्माण झाला.तसेच कोकणातल्या तिलारी धरणाच्या पाण्याचा उपयोग करता येईल .त्यानंतर मी अननसाची लागवड केली.

अननसाची लागवड करताना रोप स्वरूपात लागवड करावी लागते.वाफे तयार करून अननसाची लागवड करावी लागते.एकदा लावल्यानंतर सतत 4 वर्षे उत्पन्न सलग घेऊ शकता .त्याला मजूर पूर्णपणे बाहेरचे वापरावे लागतात. तसेच इथल्या स्थानिक एकही कामगार वापरला जात नाही याच कारण म्हणजे इथल्या स्थानिक मजुरांना कोणताही अननस शेतीचा अनुभव नसल्याने संपूर्ण मजूर वर्ग बाहेर झारखंड या राज्यातून आणावे लागतात.दळवी यांच्याकडे 35 मजूर परराज्यातून आणले आहेत.अननसाला भारतामध्ये मोठ्या मेट्रो शिटी सारख मार्केट उपलब्ध आहे. दिल्ली, युपी ,गोवा,या राज्यांमध्ये अननसाची मोठी मागणी आहे.

तसेच दोन तीन राज्यात माझ्या अननसाची प्रसिध्दी मोठी झाली आहे .त्यामुळे परराज्यातील मोठे- मोठे व्यापारी वर्ग शेतात येऊन ट्रक भरून अननस घेऊन जातात.तसेच पर जिल्ह्यातील बेळगाव सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील सुद्धा व्यापारी वर्ग अननस घेऊन जातात.

दळवी यांनी 152 एकर क्षेत्रामध्ये चार ठिकाणी अननसाची लागवड केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष अननसाला पूर्णपणे फटका बसला त्यामुळे आर्थिक मोठं नुकसान झालं. सरासरी एक एकरला एक लाख रुपये उत्पन्न मिळालं तर 152 एकर क्षेत्रामधून 1 कोटी 52 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळालं आहे.असे दळवी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here