अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार

0
116

शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेसला सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जु खर्गे व वेणूगोपाल यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. सेनेशी आघाडी करताना नेमकं कसं पुढं जायचं, यावर त्यांच्यात खल झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यांच्यात संभाव्य आघाडीतील सत्तावाटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. त्यानुसार, तिन्ही पक्षांच्या या आघाडीत प्रत्येकाला तोलामोलाची पदं मिळणार असल्याचं समजतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here