26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

सिंधुदुर्गात बर्ड फ्लूच्या धोक्याने पोल्ट्री व्यवसायीक धास्तावले कर्जाचे हप्ते कसे भरावेत याची चिंता

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – राज्यभरात बर्ड फ्लू ने थैमान घातले असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात बर्ड फ्लूचा अद्याप धोका नसला तरी मागणी घटल्यामुळे येथील पोल्ट्री व्यवसायीक धास्तावले आहेत. त्यांना कर्जाचे हप्ते कसे भरावे याची चिंता सतावत आहे.

आधीच कोरोनाने नाडले आता बर्ड फ्लू

गेले वर्षभर कोरोनाच्या काळात पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला असताना आता बर्ड फ्लू मुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते हतबल झाले आहेत. आधीच कोरोनाने नाडले आता बर्ड फ्लूमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे अशी स्थिती येथील व्यावसायिकांची झाली आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाची पुष्टी झालेली नाही. मात्र अन्य भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी चिकन खाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे चिकनची मागणी घटली आहे.

मागणी घटल्याने पक्षांच्या खाद्याचा खर्च परवडेना

आरती वारंग या माणगाव खोऱ्यातील पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्या सांगतात एकीकडे कोरोनाच्या काळात कोंबड्याना मागणी नसल्यामुळे गेले एक वर्ष पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला होता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चिकन आणि अंड्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली होती नेट चिकन 200 रुपये तर एक डझन अंड्याचा भाव 80 रूपयावंर गेला होता. आता बर्ड फ्लू मुळे
मागणी घटल्यामुळे चिकनचा दर 100 ते 120 रूपये आणि अंड्यांचा दर 45 ते 50 रूपया पर्यंत खाली आला आहे. आमच्याकडे हजारो पक्षी आहेत. त्यांना मागणी घटली आहे. त्यांच्या खाद्याचाही खर्च न परवडणारा आहे. कोरोनाच्या काळात आम्ही पक्षी अनेक लोकांना असेच देऊन टाकले होते. आता आम्ही पुरते अडचणीत आलो असून आम्हाला सरकारने मदतीचा हात द्यावा असे त्या म्हणाल्या.

सिंधुदुर्गात दीड हजार व्यावसायिक

जिल्ह्यात दिवसाला दोन लाख अंड्यांची मागणी होती. ती आता फक्त 80 हजारा पर्यंत खाली आली आहे. तर चिकनची मागणी 40 ते 45 हजार किलोची होती. ती आता 15 ते 20 हजार किलो पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिड हजार ते दोन हजार छोटे- मोठे पोल्ट्री व्यवसायीक आहेत. तर एकट्या कुडाळ मधील माणगाव खोऱ्यात चारशे ते पाचशे व्यवसायिक पोल्ट्री आणि अंड्यांचा व्यवसाय करतात.मात्र बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे आता मागणी घटल्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने मेलेल्या कोंबड्याना 90 आणि 70 रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली असलीतरी सिंधुदुर्गात रोगामुळे कोंबडी मरण्याचं प्रमाण शुन्य आहे. बर्ड फ्लू च्या भीतीमुळे मागणी घटल्याचा परीणाम व्यवसायावर झाला आहे.

कवडीमोल दराने द्यावे लागतात पक्षी

अनिल वारंग हे आपल्या पत्नीच्या व्यवसायात मदत करतात. ते सांगतात आज आमच्याकडे एक ते दीड हजार पक्षी आहेत. माझ्या पत्नीने बँकेचे 5 लाख रुपये कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. आता बर्ड फ्ल्यूची चर्चा सुरू झाल्याने लोक घाबरली आहेत. त्यामुळे इथे कोण पक्षी घ्यायला येत नाहीत. त्यामुळे करायचं काय हा प्रश्न आहे. सध्या कवडीमोल दराने आम्हाला हे पक्षी विकावे लागतात. आज मोठा खर्च आहे तो खाद्याचा. या पक्षानं 6 पोती खाद्य लागत मात्र त्यांचा जीव जगावा म्हणून तेच खाद्य आम्ही दीड पोत घालत आहोत असेही ते म्हणाले. त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा असीही त्यांची मागणी आहे.

सरकारकडे मदतीची होतेय मागणी

दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक व्यवसायीकांच्या पोल्ट्रीत दिड हजार ते दोन हजार पक्षी आहेत या पक्षाचं पुढे करायचं काय असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. गेले एक वर्षात कोरोना आणि आता बर्ड फ्लू मुळे धोक्यात आलेल्या या व्यवसायाला सरकारने मदत करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img