सिंधुदुर्गात दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध खुले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;

0
88

 

सिंधुदुर्ग – दोन्ही डोस झालेल्या व्यक्तींसाठी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोरोना सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळेनुसार खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.

या आदेशात म्हटले आहे की, राज्य शासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. तसेच देशातील व शेजारच्या राज्यांतील कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये निरंतर व सातत्याने घट होत आहे.

आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोरोना विषयक निर्बंधाचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे. राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे.

ही वस्तुस्थिती विचारात घेता, साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार महाराष्ट्र शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी खुले करण्याकरिता निर्देश पारित केलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here