सिंधुदुर्ग – जिल्ह्यात 1 जून पासून समुद्रातील मासेमारीला बंदी असल्याने. आता खाडीतील मासेमारीला सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याच्या किणारपट्टी भागात असलेल्या खाडीत मच्छीमार मासेमारी करताना पाहायला मिळत आहेत.
वेंगुर्ल्यातील कालवी बंदर खाडीत मोठ्या प्रमाणात पारंपारिक मच्छीमार मासेमारी करत आहेत. त्यामुळे मासे खवय्यांना आता खाडीतील मासे उपलब्ध होणार आहेत. 1 जून पासू समुद्री मासेमारी बंद केली जाते त्यामुळे समुद्रातील मासे खवय्याना उपलब्ध होत नाहित. मात्र पावसाळा सुरू झाला की खाडीतील मासेमारी सुरू होते. मच्छिमार बांधव खाडीतील मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. जिल्ह्यातील प्रमुख बंदरा लगत असणाऱ्या खाडीतून मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय सुरू झालेला दिसत आहे.