सिंधुदुर्गात कोरोनाबाधीत महिलेची यशस्वी प्रसूती

0
54

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकुळ येथील कोरोनाबाधीत महिलेची कोणताही आढावेढा न घेता तातडीने प्रसूती करत या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यतत्परतेचं आणि लोकसेवेचा घेतलेला वसा कसा निभावायचा, याचं प्रत्यंतर दिलं आहे.

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील ही संबंधित महिला उपचारासाठी आंबोली प्रा. आ. केंद्रात आली होती. त्यावेळी तिची तपासणी केली असता तिचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणताही आढावेढा न घेता पीपीई कीट घालून या महिलेली प्रसूती केली आणि तिच्यासह तिच्या बाळाचेही प्राण वाचवले.

या कामासाठी डॉ. अदिती पाटकर, महेश जाधव, आरोग्य सेविका गीता कविटकर, वनिता देशमुख व इतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. अधिक उपचारासाठी या महिलेला आणि तिच्या बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या कार्यतत्परतेने केलेल्या कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here