रत्नागिरीतील 45 गावांना भूस्खलनाचा धोका

0
135

 

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) राज्यातील 225 गावे भूस्खलनाच्या दृष्टीने धोकादायक ठरवली आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 45 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये भुस्खलनाचा धोका सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.

भूस्खलनाच्या दृष्टीने धोकादायक ठरलेल्या गावांचे असुरक्षिततेचे चार वर्ग केले गेले आहेत. यापैकी 47 गावे भूस्खलनास सर्वाधिक असुरक्षित असल्याचे आढळले आहे. रत्नागिरी व रायगडमधील काही भागांत असुरक्षित वस्ती असलेल्या क्षेत्राची ओळख पटवण्यासाठी जीएसआयने घेतलेल्या दोन प्रकल्पांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) विभाग 1980 पासून पश्चिम घाटात भूस्खलन घटनांचा पद्धतशीर अभ्यास करत आहे. आपत्ती-पूर्व व आपत्ती-उत्तर असे या अभ्यासामध्ये वर्गीकरण आहे. ज्यात विविध स्केलवर भूस्खलन संवेदनशीलता / धोका झोनेशन मॅपिंगचा समावेश आहे. हे धोके कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणे, भूस्खलनाची यादी मॅपिंग आणि कोणत्याही मोठय़ा भूस्खलनानंतर प्राथमिक तपासणी याचा समावेश आपत्ती नंतरच्या अभ्यासात होतो.

राष्ट्रीय भूस्खलन संवेदनशीलता मॅपिंग प्रोग्राम (एनएलएसएम) अंतर्गत, महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेशांचा अभ्यास होत आहे. अंदाजे 2,000,000 चौरस किलोमीटर क्षेत्राचा लँडस्लाइड संवेदनशीलता नकाशा 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. मार्च 2019 पर्यंत 21,50000 चौरस किलोमीटर क्षेत्र (अंदाजे) पूर्ण झाले आहे. जवळजवळ 800 चौरस किलोमीटर क्षेत्र उच्च अतिसंवेदनशील क्षेत्राखाली समाविष्ट करण्यात आले. आणि त्यानंतर मध्यम संवेदनशील झोनमध्ये 7,713 चौ.कि.मी. क्षेत्र आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीच्या 14,500 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या (अंदाजे) भूस्खलनाची संवेदनशीलता मॅपिंग पूर्ण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here